Wednesday, July 29, 2026
HomeSironchaसिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी...

सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन सादर,

गडचिरोली /सिरोंचा,०२ मार्च २०२६::- तालुक्यातील नारायणपूर (येर्रागुंटा मेथम),मेडरम,नंदीगाव, चिपुरदुब्बा व रंगय्यापल्ली येथील शेतकऱ्यांनी वनविभागाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नागपूर येथील रवी भवन येथे जाऊन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम त्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर करून कारवाई तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली.

या गावांतील शेतकरी अनेक वर्षांपासून आपल्या मालकीच्या व महसूल विभागात नोंद असलेल्या जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करीत आहेत.संबंधित जमिनी त्यांच्या नावावर अभिलेखात नोंद असून,या जमिनीव्यतिरिक्त त्यांच्याकडे अन्य कोणताही उपजीविकेचा स्रोत नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मात्र,वनविभागाकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे मोजणी करून काही जमीन वनक्षेत्रात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता नोटिसा बजावून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

भूमी अभिलेख विभागाकडून अंतिम सीमांकन व प्रक्षेपणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसताना वनविभागाने घाईघाईने कारवाई सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जमीन हेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई तात्काळ स्थगित करून सखोल चौकशी करावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी राजे साहेबांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घेत आपण महाराष्ट्रा राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्याशी या विषयावर चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू,असे आश्वासन दिले.

यावेळी भाजप सिरोंचा तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर चेम्मकारी,नारायणपूर उपसरपंच अशोक हरी,जेष्ठ नागरिक पंते मालय्या,राजन्ना कडेकरी,संपत कडेकरी,स्वामी टाकूर तसेच शेतकरीवर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular