VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती,
वर्धा, 05 ऑक्टोबर 2026::-पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून बदलत्या काळात पत्रकारांसमोर उभ्या असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी *व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या विदर्भ विभागातर्फे* ‘लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी’ या विषयावर एकदिवसीय कॅडर कॅम्पचे आयोजन वर्धा येथील अनुपमा मंगल कार्यालय, नालवाडी येथे करण्यात आले होते.
प्रमुख उपस्थिती आणि मान्यवर :-

या कॅडर कॅम्पला *कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून गृहराज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. पंकज भोयर* उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा. श्री. अनिल म्हस्के*, राष्ट्रीय अध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम, मुंबई, दिल्ली.
कार्यक्रमाचे उद्घाटक – मा. श्री. विजय चोरडिया*, प्रदेशाध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया.
प्रमुख वक्ते – मा. श्री. प्रसाद काथे*, संपादक, जय महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून :-

मा. श्री. समीर कुणावार (तालीका अध्यक्ष तथा आमदार, हिंगणघाट-समुद्रपूर), मा. श्री. दादाराव केचे (माजी विधान परिषद सदस्य), मा. श्री. राजेश बकाने (आमदार, देवळी-पुलगाव), मा. सौ. सरिता विजय गाखरे (महामंत्री भाजपा तथा माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद वर्धा), मा. श्री. पराग सोमन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा), मा. डॉ. राजीव बोरले (धोरणात्मक सल्लागार, अदानी ग्रुप उच्च शिक्षण व संशोधन, सावंगी), मा. श्री. मंगेश वरकड (जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा), मा. श्री. नरेंद्र देशमुख (विभागीय प्रदेशाध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया), मा. श्री. व्यंकटेश डुडमवार (विभागीय अध्यक्ष, विदर्भ व्हॉईस ऑफ मीडिया), मा. श्री. प्रशांत देशमुख (जिल्हा प्रतिनिधी, दैनिक लोकसत्ता), मा. श्री. राजेश मडावी (दैनिक लोकमत, चंद्रपूर), मा. डॉ. स्वप्नील बेले (जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा), मा. श्री. सुधीर पांगुळ (नगराध्यक्ष, न.प. वर्धा), मा. सौ. रेणुका रविंद्र कोटंबकर (राज्य कार्याध्यक्षा, महिला विंग, व्हॉईस ऑफ मीडिया) आणि मा. सौ. मृणाल देवेंद्र ढोक (रंदळे) (जिल्हाध्यक्षा, महिला विंग, व्हॉईस ऑफ मीडिया) उपस्थित होते.

या कॅम्पमध्ये पत्रकारितेची सद्यस्थिती, पत्रकारांच्या अडचणी, संघटनेची भूमिका, पत्रकारांची सुरक्षितता आणि पत्रकारिता अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवा आहे. बातमीमुळे अन्यायग्रस्ताला न्याय मिळतो. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता वस्तुनिष्ठ आणि निर्भीड पत्रकारिता करण्याची गरज आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

दरम्यान, राष्ट्रीय युवा संमेलन २०२६ अंतर्गत ‘वंदे मातरम् कॅम्प’साठी देशभरातून वर्धा जिल्ह्यातील वायगाव निपाणी येथील *यश महेंद्र देशमुख* याची महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यांमधून व्यंकटेश दुडोमवार, विनोद खोबे, श्रावण वाकोडे, हस्ते भगत, धनराज वासेकर, मारुती बारसागडे, प्रफुल कोटांगले, मिलिंद खोंड, निखिल कोलपकवार तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाल्याने हा कॅडर कॅम्प संघटनात्मक एकजुटीला बळ देणारा ठरला.
