Tuesday, July 28, 2026
HomeGadchiroli"स्ञी हे सृष्टीची शक्ती"_ योगिता पीपरे; गडचिरोलीत जागतिक महिला दिन उत्साहात...

“स्ञी हे सृष्टीची शक्ती”_ योगिता पीपरे; गडचिरोलीत जागतिक महिला दिन उत्साहात…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

क्रीडा क्षेत्रातील महिला-मुलींचा सन्मान,

गडचिरोली,१२ मार्च २०२६::- “स्त्री ही सृष्टीची शक्ती असून समाजातील विविध नात्यांमध्ये तिचे योगदान अमूल्य आहे. आजच्या काळात महिलांनी शिक्षण, प्रशासन, विज्ञान, क्रीडा आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे,” असे प्रतिपादन योगिता पिपरे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महिला व मुलींचा सत्कार, महिला सुरक्षेवर मार्गदर्शन तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयातील सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे होत्या. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, भारताच्या इतिहासात अनेक महान महिलांनी पराक्रम, त्याग आणि कार्यकौशल्याने देशाला दिशा दिली आहे. जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, द्रौपदी मुर्मू, निर्मला सीतारामन यांसारख्या महिलांनी आपल्या कार्याने देशाचे नाव जगभर पोहोचविले आहे.

त्याचप्रमाणे क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रातही महिलांनी मोठी झेप घेतली असून पी. टी. उषा यांसारख्या धावपटूंनी तर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ क्षेत्रात भारताचा गौरव वाढविला आहे. आजच्या पिढीतील मुलींनीही या प्रेरणादायी महिलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रगती करावी, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ओमप्रकाश संग्रामे (प्राचार्य, गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली) यांनी महिला सुरक्षा, क्रीडा क्षेत्रातील संधी आणि आत्मविश्वासाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानित खेळाडूंमध्ये धनुर्विद्या क्षेत्रातील प्रीती लता पुजेरी, अनु नैताम, कौमुदी श्रीरामवार, कराटेपटू स्वरा नेरकर, आरोही चव्हाण, सॉफ्टबॉल खेळाडू संग्रामे, तसेच मार्शल आर्ट्स क्षेत्रातील ऐन्जल देवकुले यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, डॉ. चंदा कोडवते,सौ.वैशालीताई मिलिंदभाऊ नरोटे सामाजिक कार्य करते,महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित, पुणेचे संचालक प्रमोद पिपरे, तसेच प्रकाश गेडाम, रमेश भुरसे यांची उपस्थिती लाभली.

तसेच भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा महामंत्री शालिनीताई पोहनेकर, गडचिरोली शहर महिला आघाडी अध्यक्ष व महिला-बालकल्याण समिती सभापती सीमाताई कन्नमवार, उपसभापती शिल्पा हेमके, प्रतिभाताई चौधरी, कविताताई उरकुडे, धानोरा तालुका अध्यक्ष भूमाला परचाके, गडचिरोली तालुका अध्यक्ष किरण चचाने, अनिता राय (चामोर्शी), रुमनबाई ठकरे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री अर्चनाताई बोरकुटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शालिनीताई पोहनेकर यांनी मानले.

या कार्यक्रमाला जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक महिला कार्यकर्त्या व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular