VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली ,०३ जुलै २०२६::- भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील दुर्गे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नवेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजू खंगार यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दुर्गे हॉस्पिटलचे संचालक डॉ. यशवंत दुर्गे यांच्याकडून रुग्णाच्या प्रकृतीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार प्रभावीपणे करून त्यांना लवकरात लवकर पूर्णपणे बरे करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राजू खंगार व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देत रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी डॉ. यशवंत दुर्गे, उपसरपंच राजू खंगार तसेच दुर्गे हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.
