VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिध,
BREKING NEWS
सावली तालुक्यात रानटी हत्तीचा अनेक दिवसा पासून धुमाकूळ,
आता तरी रानटी हत्तीचा बंदोबस्त करा; वनविभागावर संतप्त नागरीकांची पुकार,
चंद्रपूर /सावली,०३ जुलै २०२६::- गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तींनी आता थेट एका नागरिकाचा बळी घेतला आहे. व्याहाड-सोनापूर मार्गावर हत्तीने केलेल्या हल्ल्यात अतुल गोहने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, व्याहाड येथील रहिवासी अतुल गोहने हे दुचाकीने सोनापूरच्या दिशेने जात होते. याच दरम्यान व्याहाड-सोनापूर मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक एक अजस्त्र रानटी हत्ती येऊन उभा राहीला.
समोर काळ उभा असलेला पाहताच अतुल यांनी प्रसंगावधान राखत आपली दुचाकी रस्त्यावरच टाकली आणि जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, संतप्त हत्तीने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अतुल गोहने यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाकडून मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली.
मात्र या घटनेमुळे संपूर्ण सावली तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. गेल्या अनेक आठवड्यांपासून या भागात हत्तींचा मुक्त संचार सुरू आहे. आधी शेतीचे नुकसान आणि आता थेट माणसाचा बळी गेल्यामुळे वनविभागाच्या उपाययोजनांवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
