Tuesday, July 28, 2026
HomeWadasaजनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर - आमदार रामदास मसराम...

जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर – आमदार रामदास मसराम…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आमदार रामदास मसराम यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश,

गडचिरोली/वडसा,१६ जुलै २०२६::- देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात आज आमदार रामदास मसराम यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची त्यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी विविध गावांतील नागरिकांनी पायाभूत सुविधा, शासकीय योजना, महसूल, वीज, पाणीपुरवठा तसेच इतर स्थानिक समस्यांबाबत आपली मते व मागण्या मांडल्या. आमदार मसराम यांनी प्रत्येक नागरिकाशी संवाद साधत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली.

“जनतेचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद असून, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्या वेळेत मार्गी लागाव्यात, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,” असे आमदार रामदास मसराम यांनी यावेळी सांगितले.

जनतेची सेवा, विकासाची बांधिलकी आणि प्रत्येक समस्येचे प्रभावी निराकरण, हाच आमचा संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular