VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
NEET पेपरफुटी प्रकरणी गडचिरोलीत १७ जुलै रोजी लक्षवेध धरणे आंदोलन
गडचिरोली ,१७ जुलै २०२६::- देशभर गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी १७ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे लक्षवेध धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनाला उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्या ऐतिहासिक उपोषणाला सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला असून, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध विद्यार्थी संघटना, पालक आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनातून स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी कायमची बंद करणे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे आणि शिक्षण व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता आणणे या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
याशिवाय, उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने शासनाने त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न असून, “शिक्षण वाचवा, देश वाचवा” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
