Tuesday, July 28, 2026
HomeGadchiroliज्ञानाचा उत्सव! खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा...

ज्ञानाचा उत्सव! खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,१९ जुलै २०२६::- वाढदिवस साजरा करण्याची सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श उपक्रम राबवत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल ५,००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खासदार डॉ. किरसान म्हणाले, “पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सातत्याने अभ्यास, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. आजचे ज्ञानच उद्याचे भविष्य घडवते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत.”

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यास साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा स्पर्धा परीक्षांच्या तयारीत मोठा लाभ होणार असल्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाला आमदार अभिजीत वंजारी, आमदार रामदास मसराम, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, जीवन पा. नाट, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष सतीश विधाते यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परिश्रम, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या शिबिरात २५ हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केली.

शिक्षण आणि समाजसेवा या दोन्ही मूल्यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसाला एक वेगळी आणि प्रेरणादायी सामाजिक दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular