Saturday, September 12, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीच्या शिक्षण विकासासाठी आमदार रामदास मसराम यांचा पुढाकार...

गडचिरोलीच्या शिक्षण विकासासाठी आमदार रामदास मसराम यांचा पुढाकार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या आढावा बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा,

गडचिरोली | दि. १० सप्टेंबर २०२६ :महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली.

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील शाळांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्या, आवश्यक शैक्षणिक सुविधा, पायाभूत सोयी-सुविधा, विद्यार्थ्यांच्या गरजा तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांकडे आमदार रामदास मसराम यांनी बैठकीत लक्ष वेधले. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

गडचिरोलीसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यांप्रमाणेच उत्तम शैक्षणिक सुविधा मिळणे आवश्यक असून, त्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

“विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळांना सक्षम सुविधा मिळाल्या, तरच जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होईल,” या भूमिकेतून आमदार रामदास मसराम यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.

शिक्षण मजबूत… तरच गडचिरोलीचे भविष्य उज्ज्वल!

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular