Saturday, October 17, 2026
HomeAheriकार्यकर्त्याच्या आग्रहाला राजेंचा मान! अहेरीत वाढदिवसाचा जल्लोष कायम...

कार्यकर्त्याच्या आग्रहाला राजेंचा मान! अहेरीत वाढदिवसाचा जल्लोष कायम…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या उपस्थितीत केक कापून आनंदोत्सव; फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमला,

गडचिरोली /अहेरी, 17 ऑक्टोबर 2026::-अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसाचा उत्साह अद्यापही कायम असून, समर्थकांमधील जल्लोष थांबण्याचे नाव घेत नाही. अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक ५ मध्ये कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. राजेंचे कट्टर समर्थक सिद्देश सिडाम यांच्या विशेष आग्रहाखातर राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी उपस्थिती लावली. यावेळी केक कापून आणि फटाक्यांची आतषबाजी करून वाढदिवसाचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राजेंच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाला उधाण :-

आपल्या लाडक्या नेत्याची भेट घडल्याने सिद्देश सिडाम यांच्यासह परिसरातील समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला, तर फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या सोहळ्यात वॉर्डातील महिला, पुरुष आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून राजेंप्रती आपले प्रेम, आदर आणि जिव्हाळा व्यक्त केला.

नेता आणि कार्यकर्त्यांमधील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा अधोरेखित :-

राजकारणात नेता आणि कार्यकर्ता यांच्यातील नाते केवळ राजकीय संबंधांपुरते मर्यादित नसते, तर ते विश्वास, आपुलकी आणि निष्ठेच्या बळावर अधिक दृढ होत असते. कार्यकर्त्याच्या आग्रहाला मान देत राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपस्थिती लावल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

राजेंवरील प्रेम, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि वाढदिवसाचा उत्साह यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. आपल्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेला उत्सव आणि त्यांच्या आग्रहाला राजेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे वॉर्ड क्रमांक ५ मधील हा वाढदिवस सोहळा समर्थकांसाठी आनंदाची आणि अविस्मरणीय आठवण ठरला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular