Friday, June 5, 2026
HomeGadchiroliभाजपाची ओबीसी जागर यात्रा नसून ती गाजर यात्रा आहे,- महेंद्र ब्राह्मणवाडे...

भाजपाची ओबीसी जागर यात्रा नसून ती गाजर यात्रा आहे,- महेंद्र ब्राह्मणवाडे…

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टी चे नेते ओबीसी मतांवर निवडून येतात, निवडणुका जवळ आल्या कीं ओबीसी च्या हिताच्या गोड – गोड गोष्टी करतात, मात्र ओबीसीच्या हक्काचा देण्याची वेळ आल्यास पळवटा काढतात.

गडचिरोली, ०८ ऑक्टोंबर २०२३ ::- भाजपा सत्तेत येऊन 9 वर्ष झालीत मात्र अद्यापही OBC ची जातनिहाय जनगणना करा असे कोणत्याही नेत्यांनी मागणी केली नाही, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा भाजप चे आहेत मात्र अजूनही ओबीसी मुलाच्या शिष्यवृत्ती मिळाल्या नाही, कंत्राटीकरन आणि कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून ओबीसी बहुजनांच्या पोरांना शिक्षण आणि नोकरीं पासून दूर केल्या जात आहे. अश्या पद्धतीने आरक्षणही संपवण्याचा महापाप भाजप सरकारं करीत आहे. राज्यात ओबीसी चे 72 वसतिगृह मंजूर होऊनही अद्याप ती सूरु करण्यात आलेली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील अद्यापही जिल्ह्यातील ओबीसी समाजाला योग्य तो प्रतीनिधित्व मिळत नाही, ही मोठी शोकांतिका असून भाजप ची ही ओबीसी जागर यात्रा नुसन फक्त गाजर यात्रा आहे. यात्रेच्या माध्यमातून भाजप नेते फक्त ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र ओबीसी समाज या पुढे भाजपच्या गाजर यात्रेला बळी पडणार नाही आणि आगामी निवडणूकित ओबीसी जनता भाजप ला धडा शिकवेल.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular