Wednesday, November 11, 2026
HomeGadchiroliभगवान बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी...

भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

 आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केली संपूर्ण व्यवस्थेची पाहणी,

गडचिरोली, 11 नोव्हेंबर 2026::-क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १४ व १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे जनजाती गौरव दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज गडचिरोली येथील क्रीडा संकुलाला भेट देत कार्यक्रमाच्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य मंडपाची व्यवस्था, भोजन व्यवस्था, तसेच आदिवासी समाजातील ४५ जमातींच्या पारंपरिक देवपूजा पद्धतींचे दर्शन घडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. याशिवाय समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि सैनिक शाळेच्या परिसरातील स्वच्छता, निवास व्यवस्था व इतर आवश्यक सुविधांचाही आमदार डॉ. नरोटे यांनी आढावा घेतला.

१५ नोव्हेंबर रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जनजाती मंत्री जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री निलय नाईक, गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशीष जैस्वाल तसेच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी राज्यभरातून येणाऱ्या आदिवासी बांधवांची कोणतीही गैरसोय होऊ नये, कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध व सुरळीत व्हावे आणि सर्व आवश्यक सुविधा वेळेत पूर्ण व्हाव्यात, यासाठी आमदार डॉ. नरोटे यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी पाहणीदरम्यान भाजपचे जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाश गेडाम, श्री. कुणिलजी तसेच आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा जनजाती गौरव दिनाचा सोहळा भव्य, ऐतिहासिक आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा ठरण्याच्या दृष्टीने प्रशासन व आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular