VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सर्किट हाऊस येथे सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन केले अभिष्टचिंतन; उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी व्यक्त केल्या सदिच्छा,
गडचिरोली, ११ नोव्हेंबर २०२६::- मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, नगर परिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्ष प्रोनोती निंबोडकर तसेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन हंसराजभैय्या अहीर यांचे वाढदिवसानिमित्त उत्साहात अभिष्टचिंतन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी हंसराजभैय्या अहीर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

समाजातील वंचित व मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या विकासाच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हंसराजभैय्या अहीर यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठीही शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे हंसराजभैय्या अहीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. सर्किट हाऊस येथे झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
