Friday, June 5, 2026
HomeEtapalli१०२ रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालक यांची दिवाळी अंधारात...

१०२ रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालक यांची दिवाळी अंधारात…

VAINGANGA NEWS 24 प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार,

१०२ रुग्णवाहीकेचे चाके थांबली…

एटापल्ली ११ नोव्हेंबर २०२३ ::- महिलांना प्रसूतीपूर्वी तसेच नंतर स्तनदा मातांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत १०२ रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे; परंतु, मागील चार महिन्यांपासून रुग्णवाहिका चालकांचे वेतन झालेले नाही. कोरोना सारख्या महामारीत आपली व आपल्या परिवाराची जिवाची पर्वा न करता त्यानी सेवा देन्याचे काम केले व करत आहेत परंतु त्यांना योग्य मानधन दिले जात नाहि व दिले जाते तर ४ महिने पर्यंत त्याना वेतनाची वाट पहावी लागते. मागील आर्थिक वर्षात सेल्फ इनोवेशन संस्था खामगांव यांना वाहन चालक यांचे कंत्राट दिले गेले होते परंतु या संस्थे ने सुद्धा जिल्हा परिषदेने निधी दिला नाही मणून मागील वर्षीचे वाहन चालकांचे 2 महिन्याचे वेतन व 12 महिन्याचे pf सुद्धा दिले नाही.त्या नंतर साई माऊली या कत्राटदारामार्फत १२२८२ रू वेतन देले जाते परंतु जिल्हा परिषद चंद्रपूर येथे निधी उपलब्ध असतांना सुध्दा कंत्राटदार यांना देण्यात आले नाही जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ‘१०२’क्रमांकाच्या रुग्णवाहिका आहेत. साई माऊली प्रा. लिमिटेड कंपनीकडून कंत्राटीपद्धतीवर जवळपास २७ चालक काम करीत आहेत. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला. आहे जिल्हा परिषद चंद्रपूर येथील वरीष्ठ अधिकारी यांना विचारले असता तुमचा आमचा काहीही संबंध नाही असे उत्तरे दिली जातात दिवाळीसारख्या सणाला बहीणीला आरती मध्ये एक रुपया टाकु शकणार नाही असे सुध्दा वाहन चालक यांचे म्हणणे आहे

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular