VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,१२-०२-२०२४::-घरकुल,शौचालय,जनधन खाते,बचत गट,मुद्रा लोन,नारी शक्ती अधिनियम,मोफत गँस,अशी अनेक नवनवीन कायदे करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महिलांची काळजी घेत आहेत हे महिलांना जाउन सांगा असे आवाहन मा.चित्राताई वाघ,प्रदेश अध्यक्ष,भाजपा महिला मोर्चा,महाराष्ट्र.यानी केले.
गडचिरोली येथील महिला मेळावा,बचत गटांच्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार,नवनियुक्त महिला पदाधिकारी यांचा सत्कार या कार्यक्रमात त्या उदघाटक म्हणून मार्गदर्शन करत होत्या.अध्यक्ष म्हणून श्री प्रशांतजी वाघरे,जिल्हा अध्यक्ष,भाजपा गडचिरोली.होते.
मंचावर अल्काताई आत्राम,प्रदेश महामंत्री,भाजपा महिला मोर्चा.श्री बाबुराव जी कोहळे,लोकसभा विस्तारक,श्री प्रमोद जी पिपरे,लोकसभा समन्वयक.श्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा गडचिरोली.सौ.योगीताताई पिपरे,जिल्हा महामंत्री.सौ.रेखाताई डोळस,प्रदेश चिटणीस,भाजपा महिला मोर्चा,सौ.गीताताई हिंगे,जिल्हा अध्यक्ष,भाजपा महिला मोर्चा.मा.डोंगरे ताई.वच्छलाताई मुनघाटे उपस्थित होते.प्रदेशअध्यक्ष यांच्या शुभहस्ते महिलांचा जाहीर सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.
