VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
बस स्टॅन्ड चामोर्शी नगरपंचायत बिल्डिंग व तालुका क्रीडांगणाची केली पाहणी.
गडचिरोली/चामोर्शी,१२-०२-२०२४::- आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आपल्या विशेष प्रयत्नातून आणलेल्या चामोर्शी नगरपंचायत येथील बस स्टॅन्ड , नगरपंचायत बिल्डिंग व तालुका क्रीडांगणाची पाहणी केली.यावेळी त्यांनी विहित कामे दिलेल्या मुदतीत व दिलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे पूर्ण करावे असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे बांधकाम सभापती वैभव भिवापूरे ,सदस्य राहुल नैताम, भाजपा युवा मोर्चाचे प्रतीक राठी महामंत्री तालुका भोजराज भगत, उप अभियंता पीडब्ल्यूडी बडे, तहसीलदार वैद्य साहेब, कनिष्ठ अभियंता हेडाऊ पोलीस निरीक्षक पाटील साहेब, मंडळ अधिकारी फुलझेले ,यांचेसह संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
