Saturday, May 23, 2026
HomeChamorshiसंत श्री सेवालाल महाराज हे थोर समाज सुधारक - आमदार डॉ. देवरावजी...

संत श्री सेवालाल महाराज हे थोर समाज सुधारक – आमदार डॉ. देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

जय सेवालाल गोर बंजारा समाज जिल्हा गडचिरोली च्या वतीने जयंती कार्यक्रमाचे आयोजन.

गडचिरोली/चामोर्शी,१६-०२-२०२४::- मौजा पांढरीभटाळ येथे जय सेवालाल गोर बंजारा समाज जिल्हा गडचिरोली च्या वतीने क्रांतिकारी सतगुरू संत श्री सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी संत श्री सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील एक थोर सुधारक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ देवराव जी होळी यांनी जय सेवालाल गोर बंजारा समाज जिल्हा गडचिरोली च्या वतीने आयोजित संत सेवालाल महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.

क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. संत सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजाला उत्तम जीवन जगण्याचा मार्ग दाखवला व समाज उद्धाराचे काम केले. संत सेवालाल महाराज यांनी दिलेल्या प्रतिज्ञा ह्या केवळ बंजारा समाजासाठी नव्हे तर समस्त मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. बंजारा हा एक प्राचीन समाज आहे. बंजारा समाजातील महापुरुषांनी त्याग आणि समर्पणाची मोठी परंपरा निर्माण केली आहे.

यावेळी प्रामुख्याने गोवर्धनजी चव्हाण ऑल इंडिया बंजारा सेवा संघ, मधुकरजी भांडेकर भाजपा जिल्हा युवा मोर्चा महामंत्री, सुनीलजी पवार उपसरपंच येडानूर, चव्हाण सर मुख्यध्यापक, रायसिंग राठोड तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular