Sunday, September 13, 2026
HomeEtapalliनागरिकांची पाणी समस्या CPIने सोडवली; बंद हातपंप तात्काळ सुरू...

नागरिकांची पाणी समस्या CPIने सोडवली; बंद हातपंप तात्काळ सुरू…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /एटापल्ली, 13 सप्टेंबर 2026::-ग्रामपंचायत गुरुपल्ली अंतर्गत गुरुपल्ली गावातील श्री. विलास मटाटामी यांच्या घरासमोर असलेला हातपंप मागील चार महिन्यांपासून बंद होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.

गुरुपल्ली गावातील नागरिकांनी सदर पाण्याची समस्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे मांडली. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन कॉ. सचिन मोतकुरवार आणि CPIचे जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा केला.

CPIच्या पाठपुराव्यानंतर चार महिन्यांपासून बंद असलेल्या हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली असून तो तात्काळ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

गावात सोलर ड्युअल पंपाची सुविधा उपलब्ध असली तरी तो सूर्यप्रकाशावर अवलंबून असल्याने रात्री तसेच सूर्यप्रकाश कमी असताना त्याचा वापर मर्यादित होतो. त्यामुळे हातपंप हा नागरिकांसाठी महत्त्वाचा पर्यायी पाण्याचा स्रोत आहे.

“पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे. चार महिन्यांपासून हातपंप बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांनी समस्या आमच्याकडे मांडल्यानंतर आम्ही तातडीने पाठपुरावा केला आणि हातपंप सुरू करून दाखवला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी CPI सातत्याने संघर्ष करत राहील,” असे CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले.

यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सुरज जककुलवार यांच्यासह गुरुपल्ली गावातील नागरिक उपस्थित होते. हातपंप तात्काळ सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular