Saturday, September 12, 2026
HomeChamorshiबुद्धिबळाच्या पटावर रुदयाची दमदार चाल; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड...

बुद्धिबळाच्या पटावर रुदयाची दमदार चाल; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, 12 सप्टेंबर 2026::- प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ (चेस) स्पर्धेत रुदया नोमेश्वर जुवारे हिने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळविली आहे.

रुदया ही कार्मेल अकादमी, चामोर्शी येथील विद्यार्थिनी असून, बुद्धिबळ स्पर्धेत तिने आपल्या बुद्धिमत्तेचे, एकाग्रतेचे आणि उत्कृष्ट खेळकौशल्याचे दर्शन घडविले. प्रतिकूल परिस्थितीतही शांतपणे डावपेच आखत प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याची तिची क्षमता या स्पर्धेत विशेष ठरली.

लहान वयातच बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळात मिळविलेल्या या यशामुळे रुदयाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतही ती उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास तिचे शिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

आपल्या या यशाचे श्रेय रुदयाने आई-वडील तसेच शिक्षकवृंदांना दिले आहे. तिच्या यशाबद्दल कार्मेल अकादमीतील शिक्षक, पालक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular