VAINGANGA न्यु 24/ विशेष प्रतिनिधी,
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्षात नियोजन बैठक; महिनाभर विविध सेवाभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार,
गडचिरोली /चामोर्शी, 12 सप्टेंबर 2026::- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’ला चामोर्शी तालुक्यात व्यापक स्वरूप देण्यासाठी भाजपा चामोर्शी मंडळ सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्रमांक २, चामोर्शी येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत अभियानाच्या माध्यमातून तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, सेवाभावी, जनजागृती व जनहिताच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा समजून घेत लोकहिताचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘सेवा हीच संघटनेची शक्ती’ या भावनेतून प्रत्येक कार्यकर्त्याने अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच आपल्या जबाबदारीच्या क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबवावेत, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. बूथ पातळीपर्यंत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
अभियानाच्या कालावधीत सामाजिक बांधिलकी जपत विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असून, भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा तसेच विविध आघाड्यांच्या कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस भाजपा तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघंटे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नीरज रामानुजनवार, भाजयुमो जिल्हा सचिव नरेंद्र अलसावार, तालुका महामंत्री संजय खेडेकर, तालुका महामंत्री विष्णू ढाली, भाजयुमो तालुका अध्यक्ष भुवनेश्वर चुधरी, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा कविताताई किरमे, महिला मोर्चा तालुका महामंत्री तृप्ती चिळंगे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष रोहिदास धोटे, महादेव निकोडे, तालुका उपाध्यक्ष हर्षद भांडेकर, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष संजय चलाख, तालुका सचिव दीपक भांडेकर, भारत धोडरे, भाजयुमो तालुका महामंत्री गितेश बारसागडे, रामचंद्र वरवाडे, सुजित मंडल, विशाल माळवे, सोशल मीडिया प्रमुख प्रलय सहारे, विनोद किरमे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या नियोजनामुळे आगामी काळात ‘सेवा संकल्प अभियान’ चामोर्शी तालुक्यात व्यापक आणि प्रभावीपणे राबविले जाण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
