Wednesday, July 29, 2026
HomeWadasaगाव चलो अभियानाचे खासदार अशोक जी नेते यांच्या शुभहस्ते देसाईगंज (वडसा) तालुक्यातील...

गाव चलो अभियानाचे खासदार अशोक जी नेते यांच्या शुभहस्ते देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कुरुड व कोंढाळा या गावी शुभारंभ…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

कुरुड येथे बुथ बैठक व बुथ क्रमांक – १३०,१३१,१३२ तसेच कोंढाळा बुथ क्रमांक- १९५ या बुथावरील बैठक व गाव चलो अभियान अंतर्गत खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात संपन्न संपन्न झाली.

      देसाईगंज तालुक्यातील मौजा कुरुड व कोंढाळा या मोठ्या ग्रामपंचायत मध्ये दि.१५ फेब्रुवारी २०२४ ला खासदार अशोक जी नेते यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.

 गडचिरोली/वडसा,१९-०२-२०२४::- सर्वप्रथम कुरुड या गावातील झुरे मोहल्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला खा.नेते यांनी माल्यार्पण करून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पारधी मोहल्यातील वैराग्यमूर्ती राधेश्याम बाबा यांच्या मंदिरात भेट देऊन खा.नेते यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर खा.नेते यांनी कुरुड येथील बुथ क्रमांक – १३०,१३१,१३२ या बुथावर बैठक व भेट देऊन गावातील मुख्य रस्त्याने केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची पत्रके वाटप करण्यात आली. भिंतीवर कमल चित्र काढण्यात आले. याप्रसंगी बळीराजा चौकातील शिवजयंती उत्सव कमिटीच्या नवयुवकांशी चर्चा करून त्यांना शिवजयंती उत्सवाकरिता शुभेच्छा दिल्या.

 मौजा कोंढाळा येथील श्री दत्त मंदिराचे खा.नेते यांनी दर्शन घेऊन कोंढाळा येथील बुथ क्र.१९५ वर तसेच बुथ प्रमुख नवतरुण मंडळांची बैठक घेतली त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी युवा वीर मराठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार अशोक जी नेते व आमदार कृष्णाजी गजबे यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रसंगी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

       या प्रमुख गावातील भेटी व गाव चलो अभियान दरम्यान खासदार अशोकजी नेते यांच्यासोबत आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णाजी गजबे, लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री सदानंद जी कुथे, सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल,तालुका अध्यक्ष सुनील जी पारधी, तालुका महामंत्री वसंताजी दोनाडकर, बुथ प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य शंकर जी पारधी, ग्रामपंचायत सदस्य विलास जी भिलारे, बूथ प्रमुख भारतजी ढोरे , प्रदीप जी उरकुडे, विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व बहुसंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular