Tuesday, July 28, 2026
HomeGadchiroliमा.खा. अशोक जी नेते यांची खरपुंडी येथे तेरवी कार्यक्रमाला भेट देऊन नैताम...

मा.खा. अशोक जी नेते यांची खरपुंडी येथे तेरवी कार्यक्रमाला भेट देऊन नैताम परिवारांचे केले सांत्वन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,१७ जून २०२४::-  खरपुंडी येथील भाजपाचे तालुका महामंत्री रमेश जी नैताम यांचे मोठे बंधू स्व.योगेश देवनाथ नैताम हे दि.४ जून ला श्री.बुट हाऊसचे मालक रवी वासेकर यांच्या मृत्यूच्या अंत्यविधीला गेले होते.पण अचानक हादसा होऊन गाडी उतारावरून खाली आल्याने अडविण्याच्या नादात त्यांचा अचानक पणे हादसा होऊन जागीच मृत्यू झाला.या संबंधित माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांना माहिती मिळाल्यावर तेरवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत दुःखात सामील होऊन नैताम परिवारांचे सांत्वन केले.

यावेळी तेरवी कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश जी गेडाम, किसान मोर्चा चे प्रदेश चिटणीस रमेशजी भुरसे,डाँ. चंदाताई कोडवते,डाँ. नितिन जी कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, रमेश जी नैताम,निलेश सोमनकर तसेच गावातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular