Saturday, September 12, 2026
HomeEtapalliअतिशय हलाखीच्या परिस्थितीत एम ,पी ,एस ,सी उत्तीर्ण करून बीड्री येथील...

अतिशय हलाखीच्या परिस्थितीत एम ,पी ,एस ,सी उत्तीर्ण करून बीड्री येथील अश्विनी बनली मुंबई येथे राज्य कर सहाय्यक अधिकारी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (असो) चे वतीने अश्विनीचा जाहीर सत्कार…

Gadchiroli/एटापल्ली,०१ सप्टेंबर २०२४::- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यापासून दूरवर वसलेल्या अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त बिड्री या गावातील रहिवासी डोनाडकर कुटुंब या कुटुंबातील एक मुलगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून मुंबई येथील माजगाव डॉक येथे राज्य कर सहाय्यक या पदावर कार्य करणारी कुमारी अश्विनी अशोक डोनारकर हिचा शैक्षणिक प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे या गावात जायला धड रस्ता सुद्धा नाही.

गावात जाताना चिखल माती आणि नाल्याने वाट काढत जावे लागते गावात ग्रामपंचायत सुद्धा नाही एव्हाना गावात बीएसएनएलचा कव्हरेज सुद्धा नाही गावात बसची सोय नाही गावात विद्युत पुरवठा आहे* *पण ती न असल्यासारखाच आहे कारण लाईट गेल्यावर येईल कधी याची शाश्वती नाही गावात फक्त जिल्हा परिषद ची सातवीपर्यंत शाळा आहे पुढील शिक्षण अहेरी किंवा एटापल्ली तालुक्यात जाऊन आठ ते दहावी अथवा महाविद्यालयाचे शिक्षण घ्यावे लागते अनेक वेळा या खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी पैदल सुद्धा जाऊन शिक्षण घेतले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular