Friday, July 31, 2026
HomeNagabhidमा. खा.अशोकजी नेते यांची येनोली माल व सोनापूर या गावांना सदिच्छा भेट...

मा. खा.अशोकजी नेते यांची येनोली माल व सोनापूर या गावांना सदिच्छा भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधत विकासात्मक चर्चेचा सकारात्मक उपक्रम नागभिड,

चंद्रपूर/नागभीड, २१ जानेवारी २०२५::- माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी नागभीड तालुक्यातील येनोली माल व सोनापूर गावांना सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, मागण्या आणि प्रलंबित कामांवर चर्चा केली.यावेळी त्यांनी पक्षाच्या आगामी कार्यप्रणालीसंदर्भात मार्गदर्शन केले आणि कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे, स्थानिक पातळीवर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय राहावे,

असे आवर्जून सांगितले.या भेटीदरम्यान भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, माजी तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख अरविंद नागापुरे (सोनापूर), येनोली येथील ज्येष्ठ भाजपा नेते मारोती पा. झोडे, देवाजी झोडे, शामराव निकुरे, खुशाल मदनकर, काशीनाथ सोनवाणे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादादरम्यान त्यांनी स्थानिक प्रश्नांवर विचार-विनिमय करत आगामी काळात कार्यसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट केले. त्यांची ही भेट कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली.भेटीच्या माध्यमातून पक्षबांधणी आणि स्थानिक विकास कार्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याने स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular