Saturday, September 12, 2026
HomeGadchiroliकेंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेचा जनतेने लाभ घ्यावा...

केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेचा जनतेने लाभ घ्यावा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

रामनगर येथे प्रभु विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती.

प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या जनतेला दिल्या शुभेच्छा,

समाजाच्या वतीने माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार,

गडचिरोली, ११ फेब्रुवारी २०२५::- केंद्र सरकारने प्रभू विश्वकर्मा यांच्या नावे लघु उद्योजकास मदत होणाऱ्या विविध योजना सुरू केल्या असून त्या योजनांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी रामनगर गडचिरोली येथील विश्व ब्राह्मण पांचाळ सेवा समिती गडचिरोली च्या वतीने आयोजित श्री प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.**यावेळी श्री प्रभू विश्वकर्मा पांचाळ सेवा समिती रामनगरचे प्रभाकरजी किरमीरवार ,अविनाशजी विश्रोजवार ,निलेश बद्दलवार , राकेश राचमलवार मंचावर उपस्थित होते. यावेळी परिसरातील समाजबांधव मातृ शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होती.

यावेळी समाजाच्या वतीने माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular