Wednesday, July 29, 2026
HomeGadchiroliगडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकास मंडळाचे कार्यालय नाही? उघडण्याची मागणी डॉ. प्रणय भाऊ...

गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकास मंडळाचे कार्यालय नाही? उघडण्याची मागणी डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना…

गडचिरोली जिल्हा स्टील हब होत असताना जिल्ह्यात औद्योगिक विकास महामंडळाचे कुठलेही कार्यालय नाही? राज्य सरकारने औद्योगिक विकास महामंडळाचे जिल्ह्यात कार्यालय उघडावे – डॉ प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.

दिनांक 17 मार्च 2025 गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कोणसरी येथील लॉयड मेटल स्टील कंपनी करिता जमीन अधिग्रहण करण्याचा पहिला टप्पा पार पडला व तो यशस्वी सुद्धा झाला आणि त्यानंतर आता दुसरा टप्प्याची भव्य सुरुवात झालेली आहे यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे, ज्या अर्थी औद्योगिक विकास महामंडळाचे वतीने शेकडो हेक्टर जमिनीचे भूसंपादन करून करोडो रुपयांचे खर्च करण्यात येत आहे.

मोठ्या प्रमाणात स्टील हबचा विकास सुद्धा होत आहे परंतु गडचिरोली जिल्ह्यातील एकाही तालुक्यातील औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसी यशस्वी झालेले नाही जिल्ह्याच्या ठिकाणी औद्योगिकीकरणासाठी प्लॉटचे वाटप कागदावर करण्यात आले करण्यात आले परंतु प्रत्यक्षात गडचिरोली एमआयडीसी पूर्णपणे मोकळा आहे एकही उद्योग मोठा स्थापन झाला नाही व थातूरमातूर सिमेंट ब्रिक्स व चिल्लर उद्योग या ठिकाणी सुरू आहेत धानोरा तालुका येथे सुद्धा औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसी आहे परंतु त्या ठिकाणी सुद्धा एकही उद्योग स्थापन झाला नाही, संपूर्ण जागा खाली पडून आहे, औद्योगिक विकास महामंडळाचा बोर्ड झुकून वाकून पडत आहे? एमआयडीसी कुरखेडा त्याची सुद्धा हीच अवस्था आहे त्याचप्रमाणे, अहेरी येथे सुद्धा भूसंपादन झालेला आहे एमआयडीसी ची जागा उपलब्ध आहे संपूर्ण जागा खाली पडून आहे.

एकही उद्योग त्या ठिकाणी सुद्धा स्थापन झालेला नाही, आष्टी येथे भूसंपादन करण्याच्या नावाखाली काही शेतकऱ्यांच्या सातबारावर एमआयडीसीचा शेरा लागलेला आहे, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला रक्कम शेती मोबदला न दिल्याने अजून पर्यंत भूसंपादन झालेला नाही? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूसंपादन झालेल्या शेतकऱ्याला देण्यात येणारा मोबदला काय? रेडिरेकणार दर काय? इतर माहिती मिळण्यास अडचण होत आहे? एकीकडे स्टील हब होत आहे, तर दुसरीकडे औद्योगिक विकास महामंडळाचे पूर्णपणे इतर तालुक्यात औद्योगिक विकास करणे बाबत दुर्लक्ष करताना दिसत आहे,

संपूर्ण लक्ष स्टील हबच्या टप्पा दोन याकडे लागलेला दिसून येत आहे व प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकास महामंडळाचे कोणतेही कार्यालय नाही व कर्मचारी सुद्धा नाही? सर्वसामान्य गोरगरीब उद्योजक भूसंपादन होत असलेल्या शेतकरी यांना कुठलीच माहिती एमआयडीसी बाबत मिळत नाही? इतकेच काय जिल्हा उद्योग केंद्राला सुद्धा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक माहित नाही? सर्वसामान्य उद्योजकांना थेट नागपूर येथे जाऊन तालुक्याच्या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यासाठी अथवा जागा मागणीसाठी जाऊन माहिती घ्यावी लागत आहे,

त्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाने निदान स्टील सिटी म्हणून गणल्या जाणाऱ्या गडचिरोलीत आपले कार्यालय उघडावे व त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व कामाची यशस्वी यशोगाथा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे त्याचप्रमाणे इतर तालुक्याचा सुद्धा प्रत्यक्षात एम आय, डी, सी, स्थापन करून औद्योगिक विकास करावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भारत खटी , राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास,राहुल भाऊ झोडे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषाताई मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा भाऊ वाघाडे, नानू भाऊ उपाध्ये, मुन्नाभाउ डहारे, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर ,एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्निल मडावी, मानवाधिकार संघटना नेते प्रशांत शहा,सुमेन विश्वास, शुभंकर चक्रवर्ती यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular