VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली,२१ मार्च २०२५ ::- माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गडचिरोलीतील प्रतिष्ठित तसेच अखिल भारतीय श्री. गुरुदेव शाखा अध्यक्ष गुरुदेव भक्त डॉ. शिवनाथजी कुंभारे यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत त्यांनी सुसंवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली व त्यांचे आरोग्य उत्तम व दीर्घायुषी राहावे यासाठी प्रार्थना केली.

याच दरम्यान, माजी नगराध्यक्ष भूपेशजी कुळमेथे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने कुंभारे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. ही माहिती मिळताच मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व प्रकृतीची चौकशी करत लवकर बरे व्हावे अशी मनोकामना केली.या प्रसंगी शहर महामंत्री विनोदजी देवोजवार, जेष्ठ नेते दतुजी माकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
