Wednesday, November 4, 2026
HomeGadchiroliलोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपाचा एल्गार! ‘राष्ट्रचिंतन संवाद’मधून विरोधकांच्या अराजकतेवर जोरदार प्रहार...

लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपाचा एल्गार! ‘राष्ट्रचिंतन संवाद’मधून विरोधकांच्या अराजकतेवर जोरदार प्रहार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

५ नोव्हेंबरच्या नागपूर पदयात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन,

गडचिरोली, 04 नोव्हेंबर 2026::-लोकशाही मूल्यांचे जतन, राष्ट्रहिताचे संरक्षण आणि विरोधकांकडून पसरविल्या जाणाऱ्या कथित दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने ३ नोव्हेंबर रोजी कर्तव्य कक्ष कार्यालय, गडचिरोली येथे ‘राष्ट्रचिंतन संवाद – लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या संवाद कार्यक्रमात देशातील सद्य सामाजिक व राजकीय परिस्थिती, लोकशाही व्यवस्थेसमोरील आव्हाने, विरोधकांकडून करण्यात येणारा प्रचार तसेच जनतेमध्ये निर्माण होणाऱ्या संभ्रमाच्या मुद्द्यांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. लोकशाही संस्थांवरील विश्वास कायम राखणे, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि जनतेपर्यंत वस्तुस्थिती पोहोचविणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे यावेळी मार्गदर्शनातून अधोरेखित करण्यात आले.

दरम्यान, येत्या ५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या संकल्पनेतून भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाही मूल्यांच्या समर्थनार्थ आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामंत्री, अनुसूचित जमाती मोर्चा तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, आमदार तथा जिल्हा प्रभारी कीर्तीकुमारजी (बंटीभाऊ) भांगडिया, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई निंबोरकर, माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार नामदेवजी उसेंडी, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, माजी जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवते, माजी मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्धजी पालकर, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम व सदानंदजी कुथे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular