VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
डॉ. अविनाश टेकाडे डीन शासकीय मेडिकल कॉलेज गडचिरोली यांनी नेत्र तज्ञ म्हणून डॉ. देवश्री होळी यांना नियुक्ती पत्र दिले.
माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची कन्या गडचिरोली जिल्ह्यात देणार सेवा.
गडचिरोली/ चामोर्शी, २३ मार्च २०२५::- माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यात 17 वर्ष वैद्यकिय सेवा दिली. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकत दोन टर्म आमदार झाले. वडिलांचा वारसा पुढे चालविण्यासाठी डॉ. देवश्री होळी यांनी वैद्यकिय शिक्षण महात्मा गांधी इन्स्टिटयूट मेडिकल कॉलेज (सेवाग्राम) वर्धा येथे एम. बी. बी. एस चे शिक्षन पूर्ण केले.
त्यानंतर अश्विनी रुलर मेडिकल कॉलेज सोलापूर येथे (MS ophthalmology) शिक्षण पूर्ण करून गडचिरोली येथील मेडिकल कॉलेज येथे रुजू झाल्या. आई, वडिलांचा आग्रह गडचिरोली जिल्ह्यातच सेवा करावी अशी इच्छा सेवाभावी वृत्तीने सेवा देणार आहेत.
