Tuesday, October 27, 2026
HomeChamorshiचामोर्शीत सहायक कृषी अधिकारी संघटनेची नवी कार्यकारिणी बिनविरोध...

चामोर्शीत सहायक कृषी अधिकारी संघटनेची नवी कार्यकारिणी बिनविरोध…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

 प्रदीप मुंडे यांच्याकडे तालुका अध्यक्षपदाचा धुरा भारती कोचाळे कार्याध्यक्षपदी,

गडचिरोली /चामोर्शी, 27 ऑक्टोबर 2026::-महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटना, पुणे अंतर्गत चामोर्शी तालुका शाखेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत नवीन तालुका कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तालुक्यातील सहायक कृषी अधिकारी व कृषी सेवकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत तालुकाध्यक्षपदी प्रदीप मुंडे, तर कार्याध्यक्षपदी भारती कोचाळे यांची निवड करण्यात आली.

संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे, प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करणे आणि संवर्गातील कर्मचाऱ्यांचे हक्क व हितसंबंध जपणे, या उद्देशाने नवनियुक्त कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड :-

निवड झालेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी वैभव उत्तरवार व आशिष मोहरले, सचिवपदी उत्तम खंडारे, कोषाध्यक्षपदी गणेश सोमनकर यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा प्रतिनिधी (पुरुष) म्हणून रवींद्र गेडाम, जिल्हा प्रतिनिधी (महिला) म्हणून स्मिता निमगडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजेश्वर मळावी आणि तालुका संघटक म्हणून सोनी गावडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

कर्मचारी हितासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार :-

सहायक कृषी अधिकारी व कृषी सेवक संवर्गातील विविध समस्या, प्रलंबित प्रश्न आणि न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे आवाज उठविण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटित भूमिका घेऊन त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित सहायक कृषी अधिकारी व कृषी सेवकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेतील एकजूट अधिक मजबूत करून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय मिळवून देण्यासाठी नवीन कार्यकारिणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

चामोर्शी तालुका शाखेच्या नव्या कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडीमुळे संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळाली असून, कर्मचारी हितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular