Thursday, July 30, 2026
HomeGadchiroliभाजपच्या रामनगर बूथ क्र. ८७ च्या अध्यक्ष पदावर वर्षाताई शेडमाके यांची निवड...

भाजपच्या रामनगर बूथ क्र. ८७ च्या अध्यक्ष पदावर वर्षाताई शेडमाके यांची निवड…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ५ एप्रिल २०२५ ::- गडचिरोली येथील रामनगर वॉर्ड क्रमांक १९ येथे बूथ क्र. ८७ ची बूथ रचना समितीची बैठक काल दि. ४ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम मंदिर, रामनगर येथे भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत बूथ क्र ८७च्या अध्यक्ष पदावर सर्वानुमते वर्षाताई शेडमाके यांची तर बूथ सरचिटणीस म्हणून कविताताई उरकुडे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी जबाबदारी पार पाडली.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई शेडमाके, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, संजय मांडवगडे, देवराव भोगेवार, विजय खुणे, मंदाताई मांडवगडे, गुड्डू सरदार उपस्थित होते.

यावेळी बैठकीचे अध्यक्ष लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या बैठकीला रामनगर येथील सौ. पुष्पाताई मडावी, मायाताई मडावी, पुनम हेमके, भारती पेदाम , सोनी भोयर मनिषा सीडाम , रश्मीताई बाणमारे,सूरज मारगोणवार, भावना गद्दमवार, राजेंद्र मारगोणवार सतीश वरवाडे, संतोष कण्णाके तथा बूथ समितीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular