Saturday, September 12, 2026
HomeGadchiroliवक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे आदिवासी समाजाला मोठा दिलासा व या निर्णयाचे स्वागत -...

वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे आदिवासी समाजाला मोठा दिलासा व या निर्णयाचे स्वागत – मा.खा.डॉ. अशोकजी नेते…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद.

गडचिरोली, १० एप्रिल २०२५::- केंद्र सरकारने वक्फ बोर्ड २०२५ च्या निर्णयानुसार अनुसूचित जमातींवरील जमिनींवरील दावे रद्द केल्याने देशभरातील १२ कोटी आदिवासी समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या वतीने गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्समध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.या पत्रकार परिषदेत भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, विदर्भ संयोजिका डॉ. चंदाताई कोडवते, जिल्हाध्यक्ष डॉ. नितिनजी कोडवते, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, आशिष कोडाप, विजय शेडमाके, लोमेश कुळमेथे तसेच यांसह अनेक आदिवासी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

“लोकसभेत व राज्यसभेत विधेयक मंजूर – मोदी सरकारचा मोठा निर्णय’

वक्फ बोर्ड २०२५ संदर्भातील हे विधेयक २ व ३ एप्रिल २०२५ रोजी लोकसभा आणि राज्यसभेत सादर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय कायदा व अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्या पुढाकाराने हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले.

“आदिवासी समाजाच्या जमिनींचे हक्क अबाधित”

या निर्णयामुळे अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या “शेड्यूल ५” आणि “शेड्यूल ६” क्षेत्रातील जमिनी वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत येणार नाहीत, हे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा यासारख्या १० राज्यांतील ३०० आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाला न्याय मिळणार आहे.

“मतांच्या राजकारणासाठी विरोध” – काँग्रेस आणि घटक पक्षांचा अपयशी प्रयत्न”

या विधेयकावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या घटक पक्षांनी मतांच्या राजकारणासाठी कडाडून विरोध दर्शवला. मात्र, लोकसभेत आणि राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या नेतृत्वात चर्चा करून हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.पत्रकार परिषदेत भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत “जय सेवा, जय जोहार!” आणि “भारत माता की जय!” अशा घोषणांनी चांगल्या वातावरणात पत्रकार परिषद पार पडली.मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करेल आणि त्यांना सामाजिक व आर्थिक स्थैर्य प्रदान करेल.” असे प्रतिपादन करत देशातील १२ कोटी आदिवासी समाजाच्या वतीने भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा.खा.डॉ. अशोकजी नेते व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विश्व नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भारत सरकार चे जय सेवा जय जोहार केले.भारतातील ११.३% भूभाग अनुसूचित/आदिवासी क्षेत्रामध्ये मोडतो, तसेच ८.६% लोकसंख्या आदिवासी आहे. या पार्श्वभूमीवर, हा निर्णय आदिवासी समाजाच्या भविष्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular