Saturday, September 12, 2026
HomeAheriरजनीता मडावी दुसऱ्यांदा कमलापूर ग्रामपंचायत च्या सरपंच पदी विराजमान...

रजनीता मडावी दुसऱ्यांदा कमलापूर ग्रामपंचायत च्या सरपंच पदी विराजमान…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

कमलापूर ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी कांग्रेस (अ. प.)चा कब्जा- आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची जबरदस्त खेळी…

गडचिरोली/अहेरी, १० एप्रिल २०२५::- तालुक्यातील कमलापूर ग्राम पंचायतीच्या सरपंच पदासाठी मंगळवार 8 एप्रिल रोजी निवडणूक पार पडली. तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांना कोर्टाने अपात्र घोषित केल्याने नायब तहसीलदार एम.सी. दाते यांनी कमलापूर ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची निवडणूक घेतली. एकूण नऊ सदस्य असलेल्या कमलापूर ग्रामपंचायत मध्ये दोन सदस्य अपात्र तर एक सदस्य मयत होते. सहा सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला असून यावेळेस सरपंच पदासाठी रजनीता मडावी व इंदू पेंदाम यांनी नामनिर्देशन भरले होते त्यात रजनीता मडावी यांना चार मते मिळाली व इंदू पेंदाम यांना दोन मते मिळाली. नायब तहसीलदार एम.सी. दाते यांनी रजनीता मडावी यांना विजयी घोषित केले. सरपंच पदाची माळ रजनीता मडावी यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा पडली. उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जबरदस्त खेळी खेळले .

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रामेश्वर बाबा आत्राम यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कमलापूर ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला. सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी महत्वाची भूमिका बजाविले. यावेळेस सिनेट सदस्या व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी नवनियुक्त सरपंच रजनीता मडावी यांचे अभिनंदन केले. यावेळी सांभया करपेत, व्यंकटराव पेठा ग्राम पंचायतीचे उपसरपंच किशोर करमे, माजी सरपंच मलाया साकटी, सुदीप रंगूवार, संतोष बोमावार, दिनेश अरगेली,संजीव चकनीलवार, इरशाद शेख,बापू कुडमेथे,सुदीप रंगुवार,चंदू आत्राम,विनोद कुसराम, पत्रकार श्रीधर दुग्गीरालापाटी, विलास नेरला, नरेश कडारलावार व्यंकटेश कडारलावार किट्टा गावडे,माया आईला,रजनीता मडावी, इंदू पेंदाम,कलावती कोंडावार,संदीप पोरांलावार,लक्ष्मण रापिली आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular