Sunday, May 24, 2026
HomeGadchiroliसंत निरंकारी चैरिटेबल फाऊंडेशन दिल्ली,शाखा-गडचिरोली चे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन...

संत निरंकारी चैरिटेबल फाऊंडेशन दिल्ली,शाखा-गडचिरोली चे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

“रक्त नलियो मे नही , नाडियों बहना चाहिए “असे निरंकारी बाबा हरदेव सिंग जी महाराज यांचे मार्गदर्शन,

गडचिरोली, २७ एप्रिल २०२५::- संत निरंकारी चैरिटेबल फाऊंडेशन दिल्ली,शाखा-गडचिरोली चे वतीने दिनांक २६/०४/२०२५ रोजी महिला तथा बाल रुग्णालय गडचिरोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.शिबिरात ३८ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. संत निरंकारी चैरिटेबल गडचिरोली यांचे वतीने घेतलेल्या शिबिराचे उद्घाटन मा.आमदार मिलिंदजी नरोटे यांचे हस्ते करून रक्तदानास सुरूवात करण्यात आले.

रक्तदानाचे महान कार्यात माजी आमदार श्री देवरावजी होळी,संत निरंकारी मंडळाचे श्री.किशनजी नागदेवे झोनल इंचार्ज वडसा,डॉ.श्री.पेंदाम साहेब वैद्यकीय अधीक्षक महिला रुग्णालय गडचिरोली,श्री.पोहणकर जी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,श्री.गोविंदजी सारडा भाजपा जिल्हा महामंत्री ,श्री.गजाननजी तुंकलवार मुखी शाखा-गडचिरोली उपस्थित होते .तसेच निरंकारी मंडळाचे सर्व अनुयायी,रक्त संकलन अधिकारी डॉ.साखरे मॅडम व त्यांची चमू,डॉ.नारायण करेवार यांनी उपस्थित राहून सहकार्य केले .

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular