Sunday, September 20, 2026
HomeGadchiroliगडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा आयोजित महाराष्ट्र गौरव यात्रेचे गडचिरोली विधानसभा...

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा आयोजित महाराष्ट्र गौरव यात्रेचे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भ्रमण…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

पवित्र स्थळातील मंगलमृदा व मंगलजलाचे संकलन,

गडचिरोली, २९ एप्रिल २०२५::- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे येत्या ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त १मे ते ४मे या कालावधीत मुंबई येथे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. येत्या भव्य महोत्सवाच्या निमित्तानेच आयोजित या रथयात्रेत महामानवांचे, महापुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या, महान व्यक्तींच्या कार्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती आणून हे मंगल कलश एकत्र आणले जाणार आहे.

त्यानिमित्य पवित्र माती व पाणी संकलित करण्यासाठी गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र गौरव यात्रा काढून गडचिरोली शहरातील पोटेगाव रोड स्थित हजरत बाबा गिलानी दर्गा येथील पवित मृदा व चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले व उत्तर वाहिनी वैनगंगा नदी असलेले पर्यटन स्थळ मार्कंडा देवस्थान क्षेत्रातील मंगलजल संकलीत करण्यात आले.

या महाराष्ट्र गौरव यात्रेचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, यांनी केले. पवित्र स्थळातील संकलित केले असलेले मंगलमृदा व मंगलजल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मुंबई येथे आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात पाठवली जाणार आहे.

या महाराष्ट्र गौरव यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख,प्रदेश सचिव प्रा. ऋषीकांत पापडकर,प्रदेश संघटन सचिव लौकिक भिवापूरे,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष लीलाधर भरडकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. लोमेश जुवारे, चामोर्शी तालुका अध्यक्ष निशांत नैताम, गडचिरोली तालुका युवक अध्यक्ष कुणाल चिलगेलवार, विजय धकाते, जीवन कुत्तरमारे,, हेमंत म्हशाखेत्री, प्रदीप वडेट्टीवार, सुरज येरकलवार, तानाजी धोडरे, विलास चरडूके, व्यंकटी बुरले, विकास सातपुते, प्रणय बुरले, बारसागडे, नितीन येरकलवार, पोशाक गेडाम इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular