VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गौभक्त पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी केले.
गडचिरोली / चामोर्शी, ३० एप्रिल २०२५::- महाराष्ट्र दिनानिमित्त दिपकधाम गौशाला च्या वतीने एक हात मदतीसाठी चामोर्शी शहरातून पद यात्रा व निधी संकलनासाठी पद यात्रा काढण्यात येणार आहे.गोमाता प्राचीन काळापासूनच भारतीय धर्म आणि संस्कृती सभ्यतेची मूलाधार आहे. भारतीय संस्कृतीने प्राचीन काळापासूनच गोभक्ती जीवनातील सर्वाेत्कृष्ट कर्तव्य समजले जाते. तसेच चामोर्शी शहरात एकमेव गौशाला आहे. गौमातेचे रक्षणासाठी गौभक्तांनी पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी व गौशाला पदाधिकारी यांनी विनंती केली.
यावेळी प्रज्वल सोमणकर, विशाल सोमणकर, वैभव सोमणकर, अक्षय येनुगावर, जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, महादेव थोरेवार, प्रतीक राठी, मंगेश सोमणकर, गणेश गव्हारे, तुषार वैरागडे, प्रवीण सातपुते, प्रतीक चिचघरे, अंशुल दासरवार, अक्षय नागपुरे, साईनाथ लटारे, ईश्वर चापुलवार, प्रीतम तुळसकर, विशाल नागपुरे, अंकित सब्बनवार, निलेश नैताम तसेच गौभक्त उपस्थित होते.
