VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/घोट, ०२ मे २०२५::- स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 1 में महाराष्ट्र दिनी काळा दिन पाळून स्वतंत्र विदर्भाच्या आवाज बुलंद करण्यात आला यावेळी घोट येथील मुख्य बस स्थानक चौकात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा घोट तालुक्याची घोषणा करा च्या जयघोषाने विदर्भाच्या मागणीचा आवाज बुलंद केला यासह इतर मागण्यासाठी आंदोलनात मागणी करण्यात आली शेतकऱ्यांना कर्जमाफी करा विजेचे दर कमी करा आदी मागण्यासाठी घोट येथे शेकडो विदर्भवाद्यांनी एल्गार पुकारला याआंदोलनाचे नेतृत्व विदर्भ आंदोलन समितीचे दक्षिण विभागा जिल्हाध्यक्ष अशोक पोर्रेर्डीवार यांनी केले. याप्रसंगी घोटचे माजी पोलीस पाटील अविनाश वडेटीवार,विलास गण्यारपवार,अंनिस जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष चोपराम कांबळे,अंनिस घोट शाखेचे कार्याध्यक्ष आसिफ सय्यद,मानव अधिकार पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रुम्पा शाहा,घोट शाखेचे अध्यक्ष दिनकर लाकडे,माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास कामेलवार,माजी उपसरपंच गगांधर रामटेके, गिरजाशंकर उपाध्ये,बंडू जुवारे,प्रकाश कालबागुलवार,उमेश सरकार,बाबुराव भोवरे, अमर शाहा,नामदेव कागदेलवार,राकेश शेमले, भैय्याजी दूधबावरे,अनिता पोरेर्डीवार,विलास डोंगरे,विजयालक्ष्मी गण्यारपवार,अमित शाहा, बबलु शाहा,पत्रकार हेमंत उपाध्ये,जयंत वाकडे, अनिल रंगारी,किशोर कडू, दादाजी बारसागडे,मनोहर मेश्राम,प्रमोद रामटेके,आदी मोठ्या संख्येने विदर्भवादी जनता उपस्थित होती.
