VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
जाणाळा (तुकूम) येथे भव्य नाट्य दंडारीचे आयोजन; जय बजरंगबली नाट्य दंडार मंडळाच्या कलावंतांनी सादरीकरणातून जिंकली रसिकांची मने,
गडचिरोली /घोट, 25 ऑक्टोबर 2026::- चामोर्शी तालुक्यातील मौजा जाणाळा (तुकूम) येथे स्थानिक शारदा दंडार मंडळाच्या वतीने भव्य नाट्य दंडारीचे आयोजन करण्यात आले. चेक बेरडी येथील सुप्रसिद्ध जय बजरंगबली नाट्य दंडार मंडळाच्या कलावंतांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून उपस्थित रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखेगाव येथील रामजी पाटील नरोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून एकनाथ पाटील भुरसे, युवा मोर्चाचे नेते विनोद किरमे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उदयसिंग धीरबस्सी, खंडूसिंग खसावत, मास्टर महादेव निकोडे, प्रकाश भाऊ कोवासे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित रसिकांना मार्गदर्शन करताना प्रणय भाऊ खुणे म्हणाले की, नाट्य दंडारीच्या माध्यमातून केवळ मनोरंजन होत नाही, तर समाजाला चांगले विचार आणि योग्य दिशा देण्याचेही काम होते. नाटकातील नायक आणि खलनायक यांच्या भूमिका आपल्याला जीवनातील चांगल्या-वाईट प्रवृत्तींची जाणीव करून देतात. त्यामुळे रसिकांनी आपल्या प्रत्यक्ष जीवनात नायकाच्या चांगल्या गुणांचा अंगीकार करावा आणि खलनायकाच्या वाईट प्रवृत्तींचा त्याग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामीण भागातील पारंपरिक लोककलेला प्रोत्साहन देतानाच सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्वही यावेळी अधोरेखित झाले. जय बजरंगबली नाट्य दंडार मंडळाच्या कलावंतांनी सादर केलेल्या नाट्य दंडारीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम :-

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कमिटीचे अध्यक्ष सुनील नैताम, उपाध्यक्ष जितेंद्र भांडेकर, सचिव निकेश भुरसे, आशीष वैरागडे, धनराज भांडेकर, अंकुश बारसागडे, नागेश वैरागडे, अनिल सातपुते तसेच जाणाळा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
