Sunday, October 25, 2026
HomeGhotवनदावे आणि प्रलंबित शेतीपट्ट्यांसाठी भाडभीडीत मार्गदर्शन कार्यशाळा...

वनदावे आणि प्रलंबित शेतीपट्ट्यांसाठी भाडभीडीत मार्गदर्शन कार्यशाळा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

२८ ऑक्टोबरला भाडभीडी येथे आयोजन; डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना मिळणार मार्गदर्शन,

गडचिरोली /घोट, 25 ऑक्टोबर 2026::-चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वनहक्क दाव्यांचा आणि प्रलंबित शेतीपट्ट्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो), नवी दिल्ली, जिल्हा गडचिरोली यांच्या पुढाकारातून बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मौजा भाडभीडी (बु.) येथे माहिती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत वनजमिनीवरील प्रलंबित शेतीपट्टे, वनहक्क दावे तसेच शासनदरबारी प्रलंबित असलेल्या संबंधित प्रकरणांबाबत शेतकरी व नागरिकांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. अनेक शेतकऱ्यांचे वनदावे आणि शेतीपट्ट्यांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने या कार्यशाळेतून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत माहिती मिळावी आणि पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या कार्यशाळेस जाणाळा, रेखेगाव, आमगाव, चक क्रमांक २, अनंतपूर, कुदरसी, जंगमपूर, बिलासपूर, हळदवाही, हळदवाही टोला, मंजेगाव, राजूर बुजुर्ग, राजूर खुर्द, लाभानतांडा, मक्केपल्ली, चापलवाडा, माडेमुधोली, रेगडी, पोतेपल्ली, माडेआमगाव, विकासपल्ली, घोट आणि पेटतळा आदी गावांतील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद किरमे, मास्टर श्रीकांत वैरागडे, सचिन देशमुख, गुरुदेव सातपुते, प्रकाश कोवासे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून करण्यात येत आहे.

वनहक्क दावे आणि प्रलंबित शेतीपट्ट्यांसंबंधी प्रश्न असलेल्या शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular