VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, ११ मे २०२५ ::- काल सुट्टीच्या दिवशी गडचिरोली येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेले सहा प्रशिक्षणार्थी सावली तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी गेले असताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीनही तरुण एमबीबीएस प्रशिक्षणार्थी युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल.
व्हॉलीबॉल नदीत गेल्याने तो काढण्याच्या प्रयत्नात गोपाल गणेश साखरे (रा. चिखली, बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (रा. शिर्डी, जिल्हा अहिल्यानगर) व स्वप्निल उद्धवराव शिरे (रा. छत्रपती संभाजीनगर) हे तिघेही खोल डोहात बुडाले.या दु:खद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुखाचं डोंगर कोसळला आहे. आज सकाळी बचाव पथकाच्या प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह सापडले.

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी त्यांच्या सोबत असून दुःखात सहभागी आहोत. असे मनोगत आ .विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
ही घटना अत्यंत वेदनादायी असून राज्यासाठी ह्रदयद्रावक आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
