Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliजिल्हा परिषदेच्या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नका – मुख्य कार्यकारी...

जिल्हा परिषदेच्या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नका – मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे आवाहन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १६ मे २०२५::- “जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत सरळ सेवा व अनुकंपा तत्वावरील पदभरती ही शासन निर्णयानुसार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने व प्रामाणिकपणे राबवली जात असून, उमेदवारांनी कोणत्याही दलाल, मध्यस्थ अथवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.गट-क व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा, पदोन्नती व बदली प्रक्रियेद्वारे भरण्यात येतात. त्याचप्रमाणे, अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रतिक्षा सुचित उमेदवारांना आवश्यक दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाते. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता, संवर्गातील उपलब्ध जागा व ज्येष्ठतेनुसार पारदर्शक समुपदेशनाद्वारे नियुक्त्या दिल्या जातात, असे श्री सुहास गाडे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular