VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, २० जून २०२५::- विदर्भ कुस्तीगीर संघाच्या वतीने दिनांक 27 ते 29 जून 2025 ला पुसद जिल्हा यवतमाळ येथे विदर्भ कुस्तीगीर संघ व यवतमाळ कुस्तीगीर संघ यांच्या व्दारे 39 वी विदर्भ केसरी व कुमार मुले व मुली यांच्या स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे.
करिता तालीम कुस्तीगीर संघ जिल्हा गडचिरोली व्दारे जिल्हास्तरीय निवड चाचणी दिनांक 20 जून 2025 ला वेळ दुपारी 4.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजीत करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुस्तीपटूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन गडचिरोली कुस्तीगीर संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रमोद पिपरे यांनी केले आहे.
संपर्क: 9422153833, 9834366898
टिप :- खुला व वयोगट 14 व 17 वर्ष आतील मुले व मुली.
