Sunday, May 24, 2026
HomeGhotराज्य सरकारने घोट येथील वसुंधरा जैवविविधता वन उद्यान चे नूतनीकरण व सुशोभीकरण...

राज्य सरकारने घोट येथील वसुंधरा जैवविविधता वन उद्यान चे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा – डॉ.प्रणय भाऊ खुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/घोट, ०२ आगस्ट २०२५::- मौजा घोट हे दुर्गम व आदिवासी भागात आहे तालुक्यात प्रथमच वसुंधरा जैवविविधता वन उद्यान म्हणून घोट येथे आहे या उद्यानात संपूर्ण जिल्ह्याभरातून विद्यार्थ्यांची सहल व विविध पर्यटक या ठिकाणातील निसर्ग सौंदर्य हिरव्या गर्द झाडीत गुंजणारा पक्षाचा आवाज व विविध वन औषधी चे झाडे फुले झाडे व वनउद्यांमधील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी नेहमीच पर्यटक गर्दी करत असतात परंतु नुकताच वन उद्यानातील अंतर्गत रस्ते प्राण्यांचे मूर्ती जीर्ण झालेले आहेत.

त्यामुळे वनविद्यानाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे या ठिकाणी लहान मुलांकरता विविध खेळणी, बसण्याचे बेंच प्राण्यांचे मूर्ती, स्वागत गेट, पाणी पिण्याकरिता वाटर फिल्टर, स्प्रिंकलर, सोलर लाईट कचऱ्याकरिता डस्टबिन, संरक्षण भिंत,व अनेक प्रकारची विकास कामे करण्याकरिता निधीची गरज आहे व भविष्यात घोट येथील सदर वन उद्यान अस्तित्वात राहण्यासाठी या ठिकाणी विविध विकास कामाची नितांत गरज आहे.

करिता येथील वन उद्यान येथे शासनाच्या वतीने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वसुंधरा जैवविविधता घोटचे अध्यक्ष श्री आसिफ शौकत अली सय्यद यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांच्याकडे केली यावेळी या मागणीची दखल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ खुणे यांनी घेतली.

शासनास सदर मागणीचा पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले व सदर मागणी राज्य शासनाने तात्काळ मंजूर करावे असे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महिला आघाडी अध्यक्षा मनीषा मडावी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु उपाध्ये, तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड,तालुका उपाध्यक्ष महेंद्र मडावी, किशोर देवतळे, महिला आघाडी अध्यक्षा विशाखा सिन्हा, महिला आघाडी उपाध्यक्ष लीना विस्वास, तालुका सचिव दिनेश मुजुमदार, उपसचिव जितेंद्र शहा, राकेश शेमले, संजय कुमरे,यांनी केली आहे,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular