VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, ०७ ऑगस्ट २०२५::- शेतीच्या कामाकरिता आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तातडीने हस्तक्षेप करत दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी कालवा सल्लागार समितीच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली.या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेऊन कन्नमवार जलाशयातील पाण्याचा वापर करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

सद्यस्थितीत कन्नमवार जलाशय 100% भरलेले असून, 6.27 क्युमेक्स पाण्याचा साठा शेतीसाठी सोडण्यात आले.त्याअनुषंगाने आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते जलाशय व यंत्रणांचे विधिवत पूजन करून जलाशयातील पाणी शेतकऱ्यांच्या वापरासाठी सोडण्यात आले. यावेळी त्यांनी जलाशय परिसरातील यंत्रणा, मशिनरी आणि व्यवस्थेची पाहणी केली.पाण्याच्या सुरळीत उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, अनेक शेतकऱ्यांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे विशेष आभार मानले आहेत.
या उपक्रमामुळे खरीप हंगामातील शेतीला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळणार आहे.यावेळेस प्रामुख्याने राहुल मोरघडे (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग), विकास दुधबावरे (अभियंता, घोट), नोवेल डोंबले (अभियंता, भेंडाळा), अनिल पोहनकर (जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा), भास्कर बुरे (जिल्हाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा), मधुकर भांडेकर (जिल्हाध्यक्ष, भाजयुमो), राकेश सरकार (अध्यक्ष, घोट-आष्टी मंडळ), अनिल तिडके, रेवनाथ कुसराम (जिल्हा महामंत्री, भाजपा आदिवासी मोर्चा), संजय खेडेकर (तालुका महामंत्री, भाजपा), शेषराव कोहळे, नामदेव सोनटक्के (मा. जि.प. सदस्य), राजेंद्र चुधरी, भाविक आभारे, नीरज रामानुजनवार, विलास उईके उपस्थित होते.
