Saturday, June 13, 2026
HomeGadchiroliपोलिस टिमच्या अथक प्रयत्नाने अखेर ४८ तासानंतर काटली गावाजवळील अपघात घडविणारा...

पोलिस टिमच्या अथक प्रयत्नाने अखेर ४८ तासानंतर काटली गावाजवळील अपघात घडविणारा ट्रॅक मिळाला…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली; १० ऑगस्ट २०२५::- आरमोरी महामार्गावर 7 ऑगस्टच्या पहाटे काटलीजवळ सहा मुलांना भरधाव ट्रकने निर्दयीपणे चिरडून चार घरांचे दिवे कायमचे विझवणाऱ्या भीषण घटनेनंतर अखेर 48 तासांच्या थरारक तपासानंतर गडचिरोली पोलिसांनी आरोपी ट्रकचालक आणि त्याचा सहकारी यांना छत्तीसगडमधून ट्रकसकट पकडले. पहाटे व्यायामाला गेलेल्या सहा मुलांना भरधाव ट्रकने चिरडले. दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी दोन मुलांनी उपचारादरम्यान प्राण सोडले.

उरलेली दोन मुले गंभीर जखमी असून हेलिकॉप्टरने नागपूरला हलवून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर पाच तपास पथके उभी करून प्रत्यक्षदर्शींची साक्ष, सिसीटीव्ही फुटेज आणि न्यायवैद्यकीय अहवालांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत छत्तीसगडमध्ये सापळा रचून ट्रकसकट दोघांना ताब्यात घेतले. प्रविण बाळकृष्ण कोल्हे (26) आणि सुनिल श्रीराम मारगाये (47) असे आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, पोनि. विनोद चव्हाण, स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular