Wednesday, July 29, 2026
HomeWadasaभारतीय जनता पार्टी च्या संघटनात्मक बैठकीला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ....

भारतीय जनता पार्टी च्या संघटनात्मक बैठकीला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकिचे आयोजन,

गडचिरोली/वडसा, ११ ऑगस्ट २०२५::- येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली ची संघटनात्मक बैठक विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी हर घर तिरगा अभियान, रक्षाबंधन व विभाजन विभाषिका दिवस साजरा करण्याचे बैठकीच्या माध्यमातून सूचना देण्यात आली. बैठकीला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी प्रामुख्याने माजी खा. अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा योगिताताई पिपरे, जिल्हा सचिव दिलीप चलाख, यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, तालुका-मंडल पदाधिकारी आणि आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकिचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे तर संचालन जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular