VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, १३ ऑगस २०२५::- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) द्वारे गडचिरोली येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता कृषी चिकित्सालय सोनपूर गडचिरोली येथे या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलिंद नरोटे आ. रामदास मसराम जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे, कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. माया राऊत उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा च्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांनी कळविले आहे.
