VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण, आदिवासी विकास विभाग मंत्री प्रा. डाँ. अशोकजी उईके यांच्यासह मा.खा.डाँ.अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत पार पडली,
महाराष्ट्र/ मुंबई, १३ ऑगस्ट २०२५::- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या नरिमन पॉईंट मुंबई येथील कार्यालयात दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी भाजप प्रदेश अनुसूचित जनजाती मोर्चाची महत्वाची बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत अनुसूचित जनजाती समाजासमोरील विविध अडचणी, समस्या तसेच त्यावर उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा व मंथन करण्यात आले.बैठकीस प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण, आदिवासी विकास विभाग मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान.प्रा. डॉ. अशोकजी उईके सर यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी व हितासाठी सखोल मार्गदर्शन केले.

यासोबतच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते हे बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना म्हणाले समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय उन्नतीसाठी ठोस पावले उचलण्याचे महत्व अधोरेखित केले.

या प्रसंगी मंचावर प्रामुख्याने राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा तथा आमदार हरिश्चंद्रजी भोये, भाजपा प्रदेश कार्यालय प्रमुख श्री. रवीजी अनासपुरे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश संघटन मंत्री अँड. किशोरजी काळकर,या सोबतच बैठकीत प्रदेश महामंत्री श्री. सुदर्शनजी शिंदे, श्री.एन.डी. गावीत,जिल्हा महामंत्री श्री.प्रकाशजी गेडाम, माजी आमदार डॉ.देवरावजी होळी, श्री. वैभवजी पिचड, श्रीप्रभुदासजी भिलावेकर, माजी महापौर श्रीमती माया ताई ईवनाते,राजे विरेनशाहा उईके, श्री. रमेशजी मावसकर, श्री.गाते जी,अक्षयजी उईके,आदिवासी मोर्चा चे सर्व जिल्हा अध्यक्ष तसेच मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांना वरिष्ठ नेत्यांनी संयमपूर्वक ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्धार व्यक्त केला.बैठकीच्या शेवटी, अनुसूचित जनजाती समाजाच्या विकासासाठी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी भाजप वचनबद्ध असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
