Wednesday, July 29, 2026
HomeNagapurभगवान बिरसा मुंडा कला मंच च्या माध्यमातून आदिवासीनी आपल्या कला,गुण, पेंटिंग,न्रुत्या...

भगवान बिरसा मुंडा कला मंच च्या माध्यमातून आदिवासीनी आपल्या कला,गुण, पेंटिंग,न्रुत्या चे प्रगटिकरन करावे…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

प्रकाश गेडाम, प्रांत संयोजक जनजाती चेतना परीषद विदर्भ, बिरसा वाॅरीयर्स कार्यशाळा नागपूर येथे संपन्न,

नागपूर, १९ ऑगस २०२५::- धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त 15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर,2025 हे वर्ष आदिवासींच्या कला,गुण, संस्कृती, पेंटिंग,न्रुत्य,शुरविर शहिद, ऐतिहासिक स्थळे,प्रगट करण्याची, उज्वल अश्या संस्कृती, पर्यावरण पुरक जिवन, महिलांना सन्मान देणारी,मात्रुसत्ताक पध्दती चे नव्याने प्रगटिकरन व्हावे नव्या आदिवासी पिढीला समजावे या करीता.

“”भगवान बिरसा मुंडा कला मंच”” च्या वतीने आॅन लाईन नोंदनी सुरु:-

राज्य स्तरावर पोहचणा-याना प्रथम पुरस्कार 3 लाख, द्वितीय पुरस्कार 2 लाख,व तिसरे पुरस्कार 1 लाख दिले जाणार आहे.आदिवासी समाजाने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री प्रकाश गेडाम प्रांत संयोजक जनजाती चेतना परीषद विदर्भ,तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र महाराष्ट्र यांनी केले. भगवान बिरसा मुंडा कला मंच, नागपूर च्या वतीने बिरसा वाॅरीयर्स कार्यशाळे चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेचे समारोप करताना ते उदघाटक म्हणून बोलत होते.

मंचावर विमर्श चे श्री विरेंद्र जी चंपानेरकर,मानकर ट्रस्ट चे श्री प्रशांत जी घोपर्डीकर,व.कल्यान आश्रमा चे सचिव श्री भास्करराव जी रोकडे,धर्मजागरण चे श्री सुनील जी भोगावार, विमर्श चे श्री कांबडी जी, कल्याण आश्रम चे श्री रमेश जी आत्राम उपस्थित होते.

कार्यशाळेचे प्रास्ताविक भाषण विमर्श चे श्री विरेंद्र जी चंपानेरकर यांनी तर संचालन श्री भारत जी बुजाडे यांनी केले.यावेळी PPT च्या माध्यमातून जमीन स्तरावर काय करावयाचे आहे याचे प्रेझेंटेशन दाखविण्यात आले.

कार्यशाळेत पुर्व विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातुन वाॅरीयर्स बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular