Monday, June 8, 2026
HomeGadchiroliआमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची गडचिरोली शहरातील पाणी साचलेल्या भागांची पाहणी व...

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची गडचिरोली शहरातील पाणी साचलेल्या भागांची पाहणी व निर्देश…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १९ ऑगस २०२५::- सतत पडत असलेल्या पावसामुळे गडचिरोली शहरातील रेव्हेन्यू कॉलनी, गणेश नगर तसेच आरमोरी रोडवरील अनेक कॉलनींमध्ये पाणी साचून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

आज मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून नगरपरिषद मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली असून, तातडीने काम हाती घेऊन नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश दिले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षेला व सोयीसाठी आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येतील.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिलजी पोहनकर, भाजपा शहराध्यक्ष श्री अनिलजी कुनघाडकर, भाजयुमो शहराध्यक्ष श्री साई सिल्लमवर, श्री. सतीशजी चिचघरे, श्री. महेशजी तिडके, श्री. विशालजी हरडे, श्री. गणेशजी धाईत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सूर्यकांतजी पिदुरकर, श्री. अंकुशजी भालेराव व सहकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular